सांखळी / प्रतिनिधी
सांखळी मतदारसंघात शहरीकरण आणि ग्रामिण विकास या विषयावर नेहमी अग्रेसर राहणारे
साखळीचे नगराध्यक्ष धर्मेश सागलानी यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर आज मंगळवार 9 जुन रोजी सकाळी 11,वाजता चर्चेसाठी विशेष बैठक नगरपालिका कार्यालयात झाली
सात नगरसेवकांनी धर्मेश यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची नोटीस बजावली होती त्यात दयानंद बोर्येकर ,यशवंत माडकर,राजेश सावळ,ब्रम्हा देसाई , रश्मी देसाई ,आनंद काणेकर शुभदा सावईकर यांच्या स्वाक्षऱया होत्या ते कायम राहिल्याने 7 विरुद्ध 5 आणि एक नगर सेवक न आल्याने सांखळी पालिकेची सत्ता भाजप कडे गेल्याचे स्पष्ट झाले आहे गेली सात वर्षे सांखळी पालिकेचे सगलानी नेतृत्व करत होते
धर्मेश सागलानी यांनी अनेक वर्षे आपली सत्ता या पालिकेवर टिकवून ठेवली होती मात्र अखेर अविश्वास दाखल करण्यात आला धर्मेश यांच्या गटात आता राया पार्सेकर , ज्योती ब्लेगंन, कुंदा माडकर ,अंसिरा खान , मिळून 5 नगर सेवकांचे समर्थन आहे तर पालिकेच्या 13 सदस्या पैकी दामोदर घाडी या सकाळी पालिका कार्यालयात फिरकला च नाही
ङअविश्वास सम्पन झाला, नगराध्यक्षपद कोणाकडेङ?
सांखळी नगरपालिका क्षेत्रातील गृहनिर्माण हासाहिती कडे सांखळी शहराची मोठी मत पेटी म्हणून पाहिले जाते सुशिक्षित लोकांचा परिसर म्हणून ही याकडे पाहिले जाते येथील नगर सेविका शुभदा सावईकर यांच्या गळय़ात नगराध्यक्ष पदाची माळ पडण्याची जास्त शक्मयता वर्तवली जात आहे, त्या यंदाच्या नगर पालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून जिंकून आल्याहोत्या भाजप कार्यकर्ते आनंद काणेकर ,साखळीत अनुभवी कार्यकर्त्या रश्मी देसाई यशवंत माड कर यांची नावे चर्चा त आहेत तरी ही संखळीचे आमदार मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत आणि भाजप कार्यकारणी सदस्य नगराध्यक्ष कोण हे ठरवेल अशी माहिती उपलब्ध झाली आहे
ङदामोदर घाडी एक जादूगारङ
सांखळी पालिकेच्या नगराध्यक्ष पदाची धुरा यशस्वी रित्या सांभाळणाऱया धर्मेश सगलानी यांचे जवळचे मित्र नगर सेवक दामोदर घाडी हे आज अविश्वास ठराव च्या बैठकीत उपलब्ध राहिले नाही ते नेमके का आले नाही हे कळू शकले नाही मात्र ते संखळीच उपलब्ध होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे, त्यामुळे दामोदर घाडी भाजप ला समर्थन देईल का अशी कुजबुज सांखळी शहरात चालू आहे जर ते भाजप कड़े गेले तर सांखळी नगर पालिकेच्या 13 जगात 8 विरुद्ध 5 अशी होणार आहे त्यामुळे सांखळी पालिकेच्या राजकारणातील एक जादूगार म्हणून दामोदर घाडी यांच्या कडे पाहिले जाते









