कामगार-शेतकऱयांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
रत्ननगर, तिमणापूर, ता. मुधोळ येथील साखर कारखाना मागील काही दिवसांपासून बंद असल्याने कामगार, शेतकरी अडचणीत आले आहेत. अनेकांची थकबाकी न मिळाल्याने कर्मचारी व शेतकरी अडचणीत आले आहेत. या कारखान्याची चौकशी करून कामगार आणि शेतकऱयांची थकबाकी तातडीने परत करावी, अशी मागणी रयत सहकारी साखर कारखाना कर्मचाऱयांनी निवेदनाद्वारे केली आहे.
साखर कारखान्याने कामगार आणि शेतकऱयांची परतफेड न केल्याने कामगारांच्या पोटापाण्याच्या प्रश्न निर्माण झाला आहे. याबरोबरच कामगारांना सहावा वेतन आयोग लागू करावा, नोव्हेंबर 2020 पासून पूर्ण वेतन देण्यात यावे, हंगामी कामगारांना भत्ता मिळावा, सेवानिवृत्त कामगारांना ग्रॅच्युईटी व पीएफ सुविधा लागू करावी, याबरोबरच थकबाकी देऊन कामगारांना दिलासा द्यावा, अशी मागणीही कामगार आणि शेतकऱयांनी आंदोलनाद्वारे केली.









