सकारात्मक निर्णय घेण्याचे केंद्रीय कृषिमंत्री यांचे आश्वासन
प्रतिनिधी/कडेगाव
महाराष्ट्रातील साखर कारखाने सध्या अडचणीत असून यावर मार्ग काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे विविध जिल्ह्यातील नेते आज नवी दिल्लीत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर व केंद्रीय अन्न पुरवठा राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत साखर कारखान्यांच्या विविध अडीअडचणी बाबत तसेच साखरेची एम.एस.पी वाढविण्याबाबत बैढक झाली. या बैढकीत कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देवून साखर कारखान्याच्या समोर असणाऱ्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन महाराष्ट्रातील शिष्ट्मंडळास दिले आहे. अशी माहिती दैनिक तरुण भारतशी बोलताना माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.
यावेळी सांगली भाजपा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राहुल कुल,माजी खासदार धनंजय महाडिक, मा.आ.हर्षवर्धन पाटील ,आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, मा.आ.राजेंद्र देशमुख, कल्याणराव काळे उपस्थित होते.








