वार्ताहर / शिये
निगवे दुमाला (ता.करवीर) येथील मेंढपाळ दगडु शिवाप्पा बाडकर (वय ६०) यांच्या अंगावर साखरेने भरलेला ट्रक पल्टी झाल्याने ट्रकखाली सापडुन ते जागीच ठार झाले. त्यांच्यासह दोन मेंढ्या ही ट्रकखाली सापडुन ठार झाल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दुपारी पावणेचारच्या सुमारास दत्त दालमिया साखर कारखान्यातून साखरेची पोती भरून ट्रक निगवे मार्गे शियेफाट्याकडे निघाला होता. हा ट्रक निगवे येथील आंब्याच्या झाडाखालील स्टॉप जवळ आल्यानंतर रस्त्याच्या कडेला दगडू बाडकर हे मेंढ्या चरवत होते. ट्रक ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने ट्रक बाडकर व त्यांच्या मेंढ्यावर पल्टी झाल्याने त्याखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. बाडकर यांना शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले आहे.









