नवी दिल्ली
कोरोनाच्या काळात साखरेच्या किंमती नरम राहिल्या असल्या तरी भारत निर्यातीत मात्र नवा विक्रम करण्याची शक्मयता सांगितली जात आहे. चालू हंगामात 55 लाख टन साखरेची निर्यात होण्याचा अंदाज असून हा एक नवा विक्रम ठरणार असल्याचेही सांगण्यात येत
आहे.
50 लाख टनपैकी 45 लाख टन साखर निर्यात करण्यात आली आहे. उद्योग संघटना नॅशनल फेडरेशन ऑफ को. ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजने यासंबंधीची माहिती सादर केली. यापूर्वी 2007-2008 मध्ये भारताने 49 लाख टन साखर निर्यात केली होती.









