वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
येथील साई कॉलनीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाच्या कार्यकत्यांनी ट्रक्टर ट्रॉलीमध्ये प्लास्टिक ताडपत्री घालून कृत्रिम टाकी तयार करून त्यात जवळ जवळ 40 गणेशमूर्तीं विसर्जन केल्या. नदी, विहिरी, तलाव, आदी ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जन केल्यामुळे मूर्तीला लावलेल्या रासायनिक रंगामुळे पाणी दूषित होत आहे. या पाण्याच्या सेवनाने नदी, विहिरी, तलावातील मासे व इतर जलचर प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे. जनावरांना सुद्धा पाणी हानीकारक ठरत आहे. ट्रक्टर ट्रॉलीमध्ये विसर्जन केल्यास कोणताच धोका नाही.
साई कॉलनी येथील श्री गणेश मंडळातर्फे अनेक वर्षांपासून हा विसर्जन प्रक्रिया सुरु असल्याचीही यावेळी सांगण्यात आले. यावेळी मंडपाचे अध्यक्ष कैलास बडोदेकर, गणेश चिखलकर, युवराज तोटे, विनायक जाधव, आकाश पाटील, अमित पाटील, भूषण चिखलकर, सुशील रेडेकरसह मंडपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.









