क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक ऑल इंडिया निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून साईराज वॉरियर्स, मराठा स्पोर्ट्स एसजे संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन पुढील फेरीत प्रवेश मिळविला. तानाजी चौगुले, अनिल नाईक, मदन बेळगावकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावरती सुरु असलेल्या साईराज चषक स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सरकार गांधीनगर संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 90 धावा केल्या. त्यात तानाजी चौगुलेने 6 षटकारसह 41, सँडी यादवने 14 तर स्वप्निल मलिकने 13 धावा केल्या. साईराज बी तर्फे दत्ता बुवाने 3 तर रवी पिल्लेने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना साईराज ब संघाचा डाव 7.5 षटकात सर्व गडी बाद 49 धावात आटोपला. त्यात हर्ष बेकवाडने 17 तर दिपक नार्वेकरने 13 धावा केल्या. सरकारतर्फे प्रणय गावकरने 3 तर अनिकेत, सँडी व तानाजी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स एसजे संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 82 धावा केल्या. त्यात गणेश कोप्पाकने 41, अर्जुन भोसलेने 24, देवराज कोटीने 10 धावा केल्या. बेनकनहळ्ळीतर्फे जोतिबाने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना ब्रह्मलिंग बेनकनहळ्ळीने 8 षटकात 7 गडी बाद केवळ 18 धावाच केल्या. त्याचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. मराठा स्पोर्ट्सतर्फे अनिल नाईकने 6 धावात 4 गडी बाद केले.
तिसऱ्या सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात सर्व गडी बाद 74 धावा केल्या. त्यात मदन बेळगावकरेने 19, रब्बानी दफेदारने 12 तर संतोष सुळगे पाटीलने 11 धावा केल्या. इलेव्हन स्टारतर्फे इमतिहाजने 4 तर शशीने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इलेव्हन स्टार संघाने 8 षटकात 6 गडी बाद 38 धावाच केल्या. त्यात इमतिहाजने 22 धावा केल्या. साईराजतर्फे सुधीरने 2 गडी बाद केले.
चौथ्या सामन्यात मराठा स्पोर्ट्स एसजे संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 9 गडी बाद 63 धावा केल्या. त्यात योगेश कारवारने नाबाद 38, गौस शेखने 13 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्सतर्फे अनिकेत बी. आणि अमर यानी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सरकार स्पोर्ट्सने 8 षटकात 7 गडी बाद 51 धावाच केल्या. त्यात विजय चिन्नाने 16 धावा केल्या. मराठा स्पोर्ट्सतर्फे अनिल नाईकने 10 धावात 4 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे वल्लभ कदम, अभिषेक शेट्टी, गुरुनाथ होनगाई, कपिल कदम, शिवराज जाधव, शितल वेसणे, मनोज ताशिलदार, सचिन दळवी, मयुर हिरेमठ, सचिन चव्हाण, गिरीश अबोनगाडी, सचिन होनगेकर, भातकांडे, दिपक सोमण्णाचे, महेश फगरे यांच्या हस्ते तानाजी चौगुले, अनिल नाईक, मदन बेळगावकर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.