रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा

बेळगाव : कै. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत लॉगर संघाने झेवर गॅलरी संघाचा 11 धावानी तर साईराज वॉरियर्सने डीके लायन्स संघाचा 6 गडय़ानी पराभव केला. सामनावीर पुनित दीक्षित (लॉगर), नरेंद्र मांगुरे (साईराज) यांना गौरवण्यात आले.
जिमखाना मैदानावर लॉगर संघाने 10 षटकात 1 बाद 118 धावा केल्या. पुनित दीक्षितने 8 षटकार, 2 चौकारासह 27 चेंडूत नाबाद 71, सलमान गोकाककरने नाबाद 33 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झेवर गॅलरी संघाने 7 बाद 107 धावा केल्या. माजीद मकानदारने 32 धावा केल्या. पुनित दीक्षितने 23 धावात 3 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात डीके लायन्सने 19.4 षटकात सर्वबाद 137 धावा केल्या. रवि उकळीने 44, डॉमनिक फर्नांडिसने 42 धावा केल्या. साईराजतर्फे नरेंद्र मांगुरेने 18 धावात 4, दर्शन मयेकरने 10 धावात 3, विठ्ठल हबिबने 26 धावात 2 बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल साईराज वॉरियर्सने 18.1 षटकात 4 बाद 141 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. विठ्ठल हबिबने 60, सुदीप सातेरीने 34 तर नरेंद मांगुरेने 4 चौकारासह नाबाद 30 धावा केल्या. लायन्सतर्फे डॉमनिय फर्नांडिसने 15 धावात 2 तर हर्ष पॅट्रॉटने 1 गडी बाद केला. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे सतीश देवर पाटील, उमा शेट्टी, पुनित शेट्टी, जोतिबा गिलबिले यांच्या हस्ते उत्कृष्ट झेल विनोद देवडिगा, सर्वाधिक षटकार विठ्ठल हबीब, इम्पॅक्ट खेळाडू डॉमनिक फर्नांडिस, सामनावीर नरेंद्र मांगुरे यांना देऊन गौरविण्यात आले. दुसऱया सामन्यानंतर दीपा कुडची, पूजा बेल्लद, रिचा हण्णिकेरी यांच्या हस्ते उत्कृष्ट झेल अनंत माळवी, सर्वाधिक षटकार पुनित दीक्षित, इम्पॅक्ट खेळाडू सलमान गोकाककर, सामनावीर पुनित दीक्षित यांना चषक देऊन गौरवण्यात आले.
आजचे सामने : 1) झेवर गॅलरी वि. विश्रुत स्ट्रायकर्स (सकाळी 9 वा.), 2) अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स वि. साई स्पोर्ट्स (दु. 1 वा.)









