कै. रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव

कै. रत्नाकर शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित कै. रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 खुल्या क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात साईराज वॉरियर्स संघाने लॉगर संघाचा 7 गडय़ांनी तर एक्स्ट्रीम स्पोर्ट्सने विश्रुत स्ट्रायकरचा 3 गडय़ानी पराभव केला. नागेंद्र पाटील (साईराज), वैष्णव संघमित्र (एक्स्ट्रीम) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर सोमवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात लॉगर संघाने 20 षटकात 8 बाद 125 धावा केल्या. त्यात निलेश पाटीलने 44, पुणीत दिक्षितने 15, ज्ञानेश होनगेकरने 13, काशीर काझरने 11 धावा केल्या. साईराजतर्फे अभिषेक होणण्णावरने 21 धावात 3, भरत गाडेकरने 20 धावात 2 तर विठ्ठल हबिब, संतोष सुळगे-पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल साईराज वॉरियर्सने 17.5 षटकात 3 बाद 129 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. त्यात नागेंद्र पाटीलने 9 चौकारासह 63, विठ्ठल हबिबने 36, संतोष सुळगे-पाटीलने 16 धावा केल्या. लॉगरतर्फे हार्दिक ओझाने 23 धावात 2 तर अनंत माळवीने 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात विश्रुत स्ट्रायकरने 20 षटकात 9 बाद 138 धावा केल्या. त्यात विजयकुमार पाटीलने 29, रोशन जवळी व ऋतुराज भाटे यांनी प्रत्येकी 19, गोविंदा गावडेने 14 धावा केल्या. एक्स्ट्रीम स्पोर्ट्सतर्फे सचिन कुलकर्णीने 27 धावात 2, संदीप सोगलदने 28 धावात 2 तर सात्वीक बुद्धारेड्डीने 31 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल एक्स्ट्रीम स्पोर्ट्सने 19.4 षटकात 7 बाद 149 धावा करून सामना 3 गडय़ानी जिंकला. त्यात वैष्णव संघमित्रने 5 षटकार, 4 चौकारासह 75, गुरूप्रसाद पोतदारने 25, सदानंद सोगलदने 16 धावा केल्या. विश्रुततर्फे मिथून एम.ने 10 धावात 2, रोहित देसाईने 27 धावात 2, अन्वरअली दोडमणीने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे जे. पी. शेट्टी, रोहन सुंठणकर, शरद शेट्टी, चंदन कुंदरनाड यांच्याहस्ते उत्कृष्ट झेल अभिषेख होन्नावर, सर्वाधिक षटकार निलेश पाटील, इम्पॅक्ट खेळाडू विठ्ठल हबीब, सामनावीर नागेंद्र पाटील तर जयराम शेट्टी, श्रीधर पाटील, रोहित, विकास देसाई यांच्या हस्ते उत्कृष्ट झेल अर्जुन पाटील, सर्वाधिक षटकार वैष्णव संघमित्र, इम्पॅक्ट खेळाडू सदानंद सोगलद, सामनावीर वैष्णव संघमित्र यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
मंगळवारचे सामने – 1) अर्जुन स्पोर्ट्स हुबळी टायगर्स वि. झेवियर गॅलरी सकाळी 9 वा., 2) साई स्पोर्ट्स वि. साईराज वॉरियर्स दु. 1.30 वा.









