प्रतिनिधी / जयसिंगपूर
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आज कोल्हापूर चित्रनगरी ला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या कामांबद्दल माहिती घेतली यावेळी कोल्हापूर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील प्रमुख उपस्थित होते, कोल्हापूर चित्रीकरण सुरू असलेल्या पाटील वाडा, स्टुडिओ कॉम्प्लेक्स, टॉक शो स्टुडिओ या ठिकाणी भेटी दिल्या.
त्याचबरोबर महेश कोठारे निर्मित स्टार प्रवाह निर्मित दख्खनचा राजा जोतिबा या मालिकेच्या चित्रीकरण स्थळी, मेहंदी है रचनेवाली स्टार प्लस वरील या मालिकेच्या चित्रीकरणाच्या स्थळी भेट देऊन उपस्थित निर्माते-दिग्दर्शक व कलाकारांना शुभेच्छा दिल्या, यावेळी व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांनी चित्र नगरीमध्ये टप्पा तीन व चार अंतर्गत, अंतर्गत रस्ते, चित्रीकरणासाठी लागणाऱ्या विविध सुविधांच्या गरजांबाबत सविस्तर माहिती राज्यमंत्री यड्रावकर यांना दिली.









