ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या नापाक कारवाया सुरूच आहेत. पाकिस्तान सध्या आकाशातून हल्ला करण्याचा कट रचत आहे, मात्र, सतर्क सुरक्षा दलामुळे पाकचा हा प्रयत्न फोल ठरत आहे. गुरुवारी रात्री सांबा जिल्ह्यात सीमावर्ती भागात तीन वेगवेगळ्या ठिकाणी संशयित पाकिस्तानी ड्रोन फिरताना दिसले. मात्र, सुरक्षा दलांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर हे ड्रोन पाकिस्तानात परतले.
एसएसपी सांबा राजेश शर्मा म्हणाले की, काल रात्री सांबा जिल्ह्यातील बारी ब्रह्मना, घागवाल येथील जम्मू-पठाणकोट महामार्गावर आणि अन्य एका ठिकाणी संवेदनशील सुरक्षा आस्थापनांवर पाकिस्तानी ड्रोन घिरट्या घालत होते. मात्र, सतर्क सुरक्षा दलांनी गोळीबार केल्याने ड्रोन पाकिस्तानात परतले.









