प्रतिनिधी / पणजी
पणजी महानगरपालीकातर्फे सांतीनेज नाला साफ करण्याचे काम सुरु असून काल नाल्यातील चिखल जेसीबी मशिनद्वारे काढला जातो. काम करत अचानक जेसीबी नाल्यात कोसळी सुदैवान दिपक नामक ड्रायव्हरला काहीच दुखापत झाली नाही. तंनर पेनने जेसीबी बाहेर काढण्यात आली. दोन वर्षापूर्वी अशी एक घटना या ठिकाणी घडली होती. मनपाचे माजी महापौर सुरेंद्र फुतार्दो तसेच काही पत्रकारासोबत नाल्यात चिखल काढणारे मशिन कासळले होते. त्याची आठणव पुन्हा आली.
प्रत्येक वर्षी पावसाळय़ापूर्वी जेसीबी मशिनने नाल्याची साफसफाई केली जाते. यावर्षी सफाईचे काम सुरु होते. जेसीबीने या नाल्यातील माती चिखल तसेच प्लास्टीकचा खच काढला जातो. पण काल अचानक जेसीबी नाल्यात कोसळल्याने काही काळ काम बंद ठेवण्यात आले होते. दुपारी जेसीबीला पेनच्या सहायाने बाहेर काढले. जेसीबीचा चालकाला काहीच दुखापत झाली नाही. नाल्याची कचरा काढत असताना. जेसेबीचा तोल गेल्यान ती नाल्यात कोसळली आहे. हा नाला साफ करण्यासाठी आम्हाला ताळगाव पंचायतीचे सहकार्य लाभत असते. आता पुन्हा हे काम सुरु केले असून लवकरच हा नाला साफ केला जाणार आहे, असे मनपाचे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.
पावसाळय़ापूर्वी पणजीसह काम मनपातर्फे केले जाते. मनपातर्फे शहरातीव सर्व गटारे साफ करण्याचे काम करण्यात येत आहे. आता पावसाळा जवळ आल्याने मोठय़ा प्रमाणात पावसाळी पूर्व काम पूर्ण झाले आहे. शहरातील मुख्य सेव्हरेज वाहीन्या मुख्य गटारे तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱया झाडय़ांच्या फांद्या कापण्यात येत आहे, असे महापौरांनी सांगितले. मनपाच्या आदेशानुसार आम्ही सकाळपासून नाल्यातील माती तसेच कचरा काढण्याचे काम सुरु केले होतो. काही वेळाने जेसीबीचा तोल गेल्याने अचानक जेसीबी नाल्यात कोसळली, असे जेसीबी चालकाने सांगितले.









