तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर
सांगोला तालुक्यातील घेरडी गावामध्ये कोरोणाचा रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी तेथील आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली.
काल, शनिवारी (दि.25) सांगोला तालुक्यातील घेरडी या गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी आज, घेरडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच गावातील प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
घेरडी गावात घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांनी तपासणी करावी. सर्दी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास आदी कोरोणाची लक्षणे असणाऱ्या रुग्णाची तपासणी करावीत किंवा सिव्हिल हॉस्पिटलला कळवावे अशी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना सूचना केली.