गिरीजानाथ सेवाभावी संघाचा आदर्शवत उपक्रम
प्रतिनिधी / ओटवणे:
सांगेली येथे विधायक कार्यासाठी गिरीजानाथ सेवाभावी संघाची स्थापना करण्यात आली असून संघाच्या या विधायक उपक्रमाचा शुभारंभ सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देऊन करण्यात आला. सध्या गंभीर कोरोना रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत असुन अनेकांचे ऑक्सिजनअभावी प्राण जात आहे. हे ओळखून स्वखर्चातून सुमारे 80 हजार रूपये किमतीची ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात आली. गुरुवारी सांगेली आरोग्य केंद्रामध्ये या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी गिरीजानाथ सेवाभावी संघाचे पंढरीनाथ राऊळ (माजी जि प सदस्य), रवींद्र मडगावकर (माजी सभापती), रमाकांत राउळ (उपसरपंच), वामन नार्वेकर, रामचंद्र सावंत, दयानंद गवस (निवृत्त डीवायएसपी) शांताराम सावंत, बाळू सांगेलकर, बाबुराव कविटकर अशोक मेस्त्राr, निलेश नार्वेकर उपस्थित होते.









