जिल्हय़ातील 23 जणांचे मृत्यूः परजिल्हय़ातील दोघांचा मृत्यूः मनपा क्षेत्रात 195 वाढलेः ग्रामीण भागात 249 रूग्ण वाढले
प्रतिनिधी/सांगली
बुधवारी जिल्हय़ात नवीन विक्रमी 444 रूग्ण वाढले तर 207 जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 25 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 23 जणांचा आणि परजिल्हय़ातील दोघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 383 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे.
महापालिका क्षेत्रात 195 रूग्ण वाढले
महापालिका क्षेत्रात बुधवारी तब्बल 195 नवीन रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 116 तर मिरज शहरात 79 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात मोठयाप्रमाणात रूग्ण वाढत चालले आहेत. रॅपीड ऍण्टीजन टेस्टही मोठय़ाप्रमाणात सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ही रूग्णसंख्या वाढलेली दिसून येत आहे. महापालिकेकडून वाढत्या रूग्णसंख्येला रोखण्यासाठी अनेक ठोस उपाययोजना केल्या आहेत. तसेच महापालिकेने अदिसागर मंगल कार्यालय येथे 125 बेडचे नवीन रूग्णालय सुरू केले आहे. तसेच याठिकाणी आता ऑक्जिन आणि व्हेटिंलेटर चीही सुविधा देण्यात येत आह. पण तरीही मनपा क्षेत्रात रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. ही चिंतेची बाब आहे. मिरजेत नवीन 79 रूग्ण वाढलेले आहेत. सांगली मिरज महापालिका क्षेत्रात मात्र आजअखेर एकूण रूग्णसंख्या पाच हजार 417 झाली आहे.
ग्रामीण भागात 249 रूग्ण वाढले
बुधवारी ग्रामीण भागातही मोठय़ासंख्येने रूग्ण वाढले आहेत. नवीन 249 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये आटपाडी तालुक्यात 16, जत तालुक्यात दोन, कडेगाव तालुक्यात 14 रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात तब्बल 35, खानापूर तालुक्यात 13, मिरज तालुक्यात तब्बल 56 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 45, शिराळा तालुक्यात 20, तासगाव तालुक्यात 33 आणि वाळवा तालुक्यात 15 रूग्ण वाढले आहेत. असे एकूण ग्रामीण भागात 249 रूग्ण वाढले आहेत.
जिल्हय़ातील 23 जणांचा मृत्यू
जिल्हय़ातील 23 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये सांगली शहरातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील 61 वर्षीय व्यक्तीचा घाटगे हॉस्पिटल येथे तर 67 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर 76 वर्षीय व्यक्तीचा अदित्य हॉस्पिटल येथे 68 वर्षीय महिलेचा ऍपेक्स हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. मिरजेतील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोना हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. तर 67 वर्षीय व्यक्तीचा सिनर्जी हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. 56 वर्षीय महिलेचा वानलेस हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. तासगाव येथील तिघांचा मृत्यू झाला त्यामध्ये 25 वर्षीय युवकाचा कोरोना हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. तर 55 वर्षीय महिला आणि 77 वर्षीय व्यक्तीचा सांगली सिव्हील हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. कुंडल येथील 76 वर्षीय महिलेचा कोरोना रूग्णालयात. आष्टा येथील 46 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. मिरज तालुक्यातील कवलापूर येथील 60 वर्षीय व्यक्तीचा तसेच पलूस येथील 61 वर्षीय व्यक्तीचा वानलेस हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मिरज तालुक्यातील बुधगाव येथील 48 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात. पलूस येथील 52 वर्षीय व्यक्तीचा, तासगांव तालुक्यातील कचरेवाडी येथील 63 वर्षीय व्यक्तीचा ओम श्री हॉस्पिटल येथे मृत्यू झाला.
मिरज तालुक्यातील लिंगनुर येथील 50 वर्षीय व्यक्तीचा मिरज चेस्ट हॉस्पिटल येथे तासगांव तालुक्यातील मणेराजुरी येथील 48 वर्षीय व्यक्तीचा भारती हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. उपळावी येथील 55 वर्षीय व्यक्तीचा सिव्हील हॉस्पिटल येथे. वाळवा येथील 53 वर्षीय व्यक्तीचा तर मसुचीवाडी येथील 28 वर्षीय युवकाचा तसेच मालेवाडी येथील 46 वर्षीय व्यक्तीचा प्रकाश हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. या 23 व्यक्तीच्या मृत्यूमुळे जिल्हय़ातील एकूण बळीची संख्या 383 झाली आहे.
परजिल्हय़ातील दोघांचा मृत्यू
बुधवारी परजिल्हय़ातील दोघांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये कोल्हापूर जिल्हय़ातील इचलकरंजी येथील 65 वर्षीय व्यक्तीचा सिनर्जी हॉस्पिटल येथे तर शिरोळ येथील 51 वर्षीय व्यक्तीचा मिरज चेस्ट हॉस्पिटल येथे मृत्यू झाला. परजिल्हय़ातील 92 जणांचे आजअखेर मृत्यू झाले आहेत.
207 जण कोरोनामुक्त
बुधवारी जिल्हय़ात उपचार सुरू असणारे तब्बल 207 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रूग्ण बरे होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जिल्हय़ात आजअखेर बरे झालेल्या रूग्णांची संख्या पाच हजार 759 झाली आहे. त्यामुळे रूग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढतच चालली आहे.
नेते, तसेच पोलीस कोरोनाबाधित
विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांनी स्वतःहून त्याची माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली आहे. तसेच कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निरज उबाळे हेही पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या वडिलांना कोरोना झाल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय मिरजेतील आजी आणि माजी नगरसेवकांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती
एकूण रूग्ण 9414
बरे झालेले 5759
उपचारात 3272
मयत 383