प्रतिनिधी / सांगली
जमिनीच्या संदर्भात सुनावणीचा निकाल देण्यासाठी ७० हजार रूपये लाच मागून पहिला हप्ता २५ हजार रूपये स्विकारताना मंडल अधिकाऱ्याचा अतिरिक्त कार्यभार पाहणाऱ्या मंडल अधिकारी व संगणक ऑपरेटरला लाचलुचपत विभागाने अटक केली.
श्रीशैल उर्फ श्रीकांत विश्वनाथ घुळी (वय ५६ रा. शिवाजीनगर, मालगाव ता. मिरज) आणि संगणक ऑपरेटर समीर बाबासाहेब जमादार (वय ३६, रा. मल्लेवाडी, ता. मिरज) असे या अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.सांगलीतील राजवाडा परिसरातील मंडल अधिकारी कार्यालयात ही कारवाई केली.लाचखोरांविरूद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Previous Articleउपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी स्वीकारला पदभार
Next Article कर घेताय मग विकास कोण करणार?








