द्राक्ष बागा व आंबा पिकाचे मोठे नुकसान
प्रतिनिधी/हातनूर
तासगाव तालुक्यातील हातनूरसह विसापूरच भागात वादळी वारा व गारांसह पाऊसाने दमदार हजेरी लावली. यामुळे द्राक्ष बागा, बेदाणे व आंबा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. याशिवाय वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे पडली असून अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून पडल्या आहेत. द्राक्ष बागांमध्ये कडी तयार करण्याचे काम सुरू आहे ,गारांच्या पावसाने द्राक्षबागायातदारांची डोकेदुखी वाढली आहे.
टंचाईग्रस्त भागात दमदार पाऊस पडल्याने ऊस, मका भाजीपाला या पिकांना जीवदान मिळाले. यामुळे शेतकरी समाधानी आहे. काही गावात गारांचा पाऊस पडला. त्यामुळे द्राक्षबागाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पाऊस शेतकऱ्यांना इतर पिकांना व मेहनत करण्यासाठी महत्त्व पूर्ण ही समजला जातो.
तासगाव तालुक्यातील हातनूर, मांजर्डे या भागात वादळी वारे विजांच्या गडगडाटासह गारांचा पाऊस पडला. यामुळे द्राक्ष,बेदाणा सह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी द्राक्षवेलींची पाने गारांमुळे फाटली आहेत,काड्या मोडल्या आहेत.मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागेतील द्राक्षांचे नुकसान झाले आहे. ,फुले,आंबा यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय जनावरांचा चारा ही भिजून गेला. या सर्व नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.
टंचाईग्रस्त भागाला मोसमीपूर्व या पावसाने दिलासा मिळाला आहे.पाण्याअभावी वाळून चाललेल्या ऊस, मका, भाजीपाला या पिकांना काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे. द्राक्ष बागासोडून शेतीच्या मशागतीची कामे सुरू करण्यासाठी पाऊस लाभदायक ठरला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








