प्रतिनिधी/सांगली
सांगली शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारे हरिपूर हे कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम झालेले गाव पर्यटकांचे नवे आकर्षण ठरत आहे.
हरिपूर येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात दर सोमवारी भाविकांची मोठी गर्दी होते. तसेच श्रावणामध्ये येथे मोठी यात्रा भरते. हरिपूर रस्त्यावरील बागेतील गणपतीही भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथेही दर्शनासाठी लोकांची गर्दी असते. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या कृष्णा नदीवरील पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून येत्या तीन महिन्यात हे काम पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील कोथळी, दानोळी, कुंभोज, तमदलगे आदी गावांना हरिपूर आणि सांगली ही दोन्ही गावे जवळ येणार आहेत त्यामुळे भविष्यात हरिपूर गावाचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व आणखी वाढणार आहे. सध्या हरिपूर ते कोथळी असा होडीतून फेरफटका मारण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची झुंबड उडालेली आहे.
Previous Articleपंजाब : कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 56 हजार 839 वर
Next Article मंगळसूत्र हिसकावण्याच्या गुह्यात वाढ








