प्रतिनिधी / सांगली
कोरोना रूग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन हरिपूर ता. मिरज येथे रविवार 13 सप्टेंबर रात्री बारापासून रविवार 20 सप्टेंबर रात्री पर्यंत जनता कर्फ्यु जाहीर करण्यात आला आहे, ही माहीती अरविंद तांबवेकर व हरिपूरचे सरपंच विकास हणबर यांनी दिली.
हरिपूरचे नेते तांबवेकर, सरपंच विकास हणबर, ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध पदाधिकारी, जेष्ठ ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला.
तांबवेकर यांनी सांगितले की, सर्वत्र कोरोनाने बाधित रूग्णांची संख्या प्रचंड वाढत आहे. हरिपूरमध्येही गेल्या काही दिवसात बरेच जण कोरोना पाॅजिटिव्ह आले आहेत.काही जणांचा कोरोनाने मृत्यूही झाला आहे. आणखी धोका वाढू नये यासाठी गर्दी टाळणे संपर्कसाखळी तोडणे आवश्यक आहे.त्यामुळे हरिपूरमध्ये आठ सात दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.कोरोनाला रोखण्यासाठी,साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्युचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे हरिपूरमधील सर्व ग्रामस्थ, व्यापारी, व्यवसायक यांनी सहकार्य करावे. कोरोनाचे संकट परतवण्यासाठी गर्दी टाळा, मास्क व सॅनिटायझरचा वापर नित्यनियमाने करा.
कोणत्याही कारणाने आजारी पडला तर आरोग्य विभाग, डाॅक्टर यांच्याशी तात्काळ संपर्क साधा, कोणत्याही आजाराकडे अजिबाद दुर्लक्ष करू नका.
Previous Articleसांगली जिल्ह्यात नवे 936 रूग्ण, तर 754 कोरोनामुक्त
Next Article सरकारी कर्मचाऱयांसाठी 5 टक्के बेड राखीव








