प्रतिनिधी / सांगली
हरिपूर तालुका मिरज येथे गजानन कॉलनी या उपनगरात 1 कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने हरिपूर ग्रामपंचायतीच्यावतीने संबंधित ठिकाणी तात्काळ सर्व त्या उपाय योजना करण्यात आल्या असून 30 जुलै अखेर गावात कडकडीत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती हरिपूरचे सरपंच विकास हणबर व ग्रामसेविका राठोड यांनी दिली आहे. विशेषतः मॉर्निंगवॉक व सायकलींगसाठी येणाऱ्यांनी नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दवंडीच्या माध्यमातून गावात याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
जिल्ह्यात सर्वत्रच कोणाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या चार महिन्यांपासून हरिपूर मध्ये पुरेपूर खबरदारी घेत कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यात आले होते. मात्र गुरुवारी सायंकाळी हरिपूर मधील गजानन कॉलनी येथे एक कोरोना बाधित रुग्ण आढळलेला आहे. संबंधित रूग्णावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले, असून त्यांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गजानन कॉलनी परिसरात औषध फवारणीसह इतर सर्व उपाय योजना तात्काळ करण्यात आल्या आहेत. शासन नियमानुसार कंटेन्मेंट झोन तयार करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी हरीपुर गावांमध्ये 30 जुलै अखेर कडकडीत बंद पाळण्यात आला निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत याची सर्वांनी नोंद घेऊन सहकार्य करावे असे आव्हान ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली आहे. यावेळी अरविंद तांबवेकर, पोलीस पाटील उमाकांत बोंद्र, उपसरपंच स्नेहलता पवार यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








