प्रतिनिधी / सांगली
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अखेर भाजपचे निरंजन आवटी यांनी बाजी मारली. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार फिरोज पठाण यांचा त्यांनी २ मतांनी पराभव केला. आवटी यांच्या रूपाने मिरज शहराला सलग तिसऱ्यांदा सभापती पद मिळाले आहे. आवटी यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकानीं गुलालाची उधळण करत विजयोत्सव साजरा केला.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी काम पाहिले. आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव चंद्रकांत आडके उपस्थित होते. स्थायी समितीमध्ये भाजपाचे ९ तर काँग्रेस ४ व राष्ट्रवादीचे तीन सदस्य आहेत. आवटी यांना ९ तर पठाण यांना ७ मते मिळाली. ऑनलाईन पद्धतीने मतदान झाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








