प्रतिनिधी/सांगली
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तिघा दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. अमित दिपक मोहिते (वय-19 रा. ग्रामपंचायत जवळ करगणी, ता.आटपाडी), लक्ष्मण शहाजी चव्हाण (२१ रा.नंदीवाली वस्ती बनपूरी रोड, करगणी ता.आटपाडी), विजय सुखदेव निळे (२२ रा. करगणी ता.आटपाडी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत. त्यांच्याकडून 14 मोटर सायकली असा 6 लाख 85 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना आटपाडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड याचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, अंच्युत सुयवंशी, सतिश आलदर, अनिल कोळेकर, संदीप नलवडे, सागर टिगरे, सतोष गळवे, मच्छिंद्र बर्डे, जितेद्र जाधव, संदीप गुरव, मुदस्सरपाथरवट, सोहेल कार्तीयानी, शशिकांत जाधव, बजंरग शिरतोडे यांनी पार पाडली.
Previous Articleप्रथमच राज्याचे कृषी निर्यात धोरण येणार
Next Article नववर्ष जल्लोषावर कोरोनाचा प्रभाव








