प्रतिनिधी / जत
जत तालुक्यात सार्वजनिक ठिकाणाहून अनेक मोटरसायकली चोरीस जाण्याचे मोठे प्रमाण आहे. याबाबतच्या तक्रारी पोलिस ठाण्यात नोंद असून अधिक चौकशी करीता स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस रेकॉर्डवरील आरोपीचा स्थानिक गुन्हे अन्वेषणचे प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर शोध घेत होते. यावेळी सागर पवार पारधी वस्ती, पांडोझरी, (ता.जत) हा चोरीतील मोटर सायकलसह संख येथे फिरत असताना सापळा रचून पथकाने ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी, शनिवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संख येथे सागर पवार या युवकास मोटरसायकली चोरी केल्याच्या कारणावरून सापळा रचून ताब्यात घेतले असता, संशयित पवार यांच्याकडे अधिक चौकशी केली असता पवार यांच्याकडील मोटरसायकलच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. सखोल चौकशी करता असताना ताब्यात असणारी मोटर सायकल जत येथून चोरल्याची कबुली दिली.
या मोटर सायकल बाबत माहिती घेतली असता जत पोलीस ठाणे येथे मोटर सायकली चोरी झाले बाबतचा गुन्हा नोंद असलेचे निदर्शनास आले. याशिवाय पवार याने जत, जयसिंगपूर, सोलापूर, विजापूर या ठिकाणी त्याचे मित्राने मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली . चोरुन आणलेल्या सर्व मोटरसायकली पांडोझरी येथे असल्याचे लक्षात आल्याने पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून १६ मोटर सायकलींसह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, स्थानिक गुन्हा अन्वेषण चे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत अभिजीत सावंत ,सहा. पोलीस फौजदार अच्युत सुर्यवंशी, जितेंद्र जाधव, सतीश आलदर, मच्छिद्रं बर्डे, राजाराम मुळे, राजु शिरोळकर, संजय पाटील, आमसिध्दा खोत, सागर टिंगरे, आदींनी सहभाग घेतला.
Previous Articleकोल्हापूर : चंदगड तालुक्यात कोरोनाने एकाचा मृत्यू, नवे १४ रुग्ण
Next Article निर्यातविषयक सज्जतेत गुजरात अव्वल








