प्रतिनिधी / कडेगाव
इंग्लंडची राजधानी लंडन येथे आयोजित ‘मिसेस इंडिया युके’ या इंग्लंडस्थित भारतीय विवाहित महिलांसाठीच्या सौंदर्यस्पर्धेत मराठमोळ्या महिला डॉक्टर आणि सांगली जिल्ह्यातील सोहोली (ता कडेगाव)येथील स्नूषा डॉक्टर स्मिता प्रशांत मोहिते यांनी बाजी मारली आहे. अलिकडेच लंडन येथे पार पडलेल्या या स्पर्धेत ‘मिसेस इंडिया युके २०२०’चा मुकूट त्यांनी जिंकला.मराठ मोळी महिला मिसेस इंडिया युके २०२०चा बहुमान पटकाविला
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील सोहोली या गावातील मूळ रहिवासी असलेले डॉक्टर प्रशांत नानासाहेब मोहिते हे गेली १० वर्षांपासून लंडन येथे ह्दय आणि फुफ्फुस प्रत्यारोपण तज्ञ्ज म्हणून हेअरफिल्ड हास्पिटलमध्ये कार्यरत आहेत. त्यांची पत्नी डॉ. स्मिता मोहिते या सुद्धा कर्करोग तज्ञ्ज म्हणून लंडनमध्ये कार्यरत आहेत.
लंडन येथील एजीपीएल समुहाकडून दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते. यावर्षी कोरोना असल्याने तीन महिन्यात टप्प्याटप्प्याने ही स्पर्धा विविध निकषांवर घेण्यात आली. स्पर्धकांना प्रश्नेही विचारण्यात आली आणि त्यांची बुद्धीमत्ता, समयसूचकता तपासण्यात आली. विविध कसोट्यांवर सरस ठरलेल्या डॉ. स्मिता मोहिते यांना १६ आगस्ट रोजी मिसेस इंडिया युके या पुरस्काराने एका खास सोहळ्यात सन्मानितही करण्यात आले.
धुळे येथील अॅड.भालचंद्र पवार आणि उषा पवार यांच्या त्या कन्या आहेत. कडेगाव तालुक्यातील सर्वच क्षेत्रातून कौतुक करीत अभिनंदन केले जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








