प्रतिनिधी / सांगली
कोरोना कालावधीत दि. १ मार्च २०२० ते दि. २८ फेब्रुवारी २०२१ अखेर ज्या घरातील २१ ते ७० या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे, अशा विधवा झालेल्या महिलांना महिला व बाल विकास विभागाच्या जिजामाता, जिजाऊ या योजनेंतर्गत ५० हजार रूपये प्रति लाभार्थी मिळतील अशी पोस्ट सध्या व्हाटस्ॲपवर व्हायरल होत आहे.
सदरची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर ही पोस्ट खोटी व बनावट असून अशा प्रकारची कोणतीही योजना महिला व बाल विकास विभागामार्फत राबवली जात नसल्याचे सांगण्यात आले आहे. या मेसेजला नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहनही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले आहे.