दोघांना अटक : दहा गुन्हे उघडकीस : विटा पोलिस निरीक्षक संतोष डोके यांची माहिती
प्रतिनिधी / विटा
विट्यासह आटपाडी, कडेगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पोलिस ठाणे हद्दीतील दुचाकी आणि घरफोड्या करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांच्या मुसक्या विटा पोलिसांनी आवळल्या. संशयित अमोल विष्णू कांबळे (सुलतानगादे, ता. खानापूर) आणि लक्ष्मी सुभाष टोकले (सांगोला, जि. सोलापूर) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून १ लाख ८० हजार रूपये किंमतीच्या दुचाकी व सोन्याचे दागिने जप्त केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.









