प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील सोनी येथे दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे पती-पत्नी ठार झाले. रविवारी रात्री हा अपघात झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद झाली आहे.
अनिल उर्फ बाळासाहेब आप्पासाहेब चौगुले (वय 57) आणि त्यांची पत्नी सखुबाई बाळासाहेब चौगुले (वय 52) हे दोघे मोटारसायकलीवरून दूध घालण्यासाठी जात होते. ते सोनी गावापासून काही अंतरावर आले असता, एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात समोरून येणाऱ्या दुसऱ्या मोटरसायकलीला जोराची धडक बसली. या अपघात अनिल उर्फ बाळासाहेब चौगुले आणि त्यांची पत्नी सखुबाई चौगुले हे दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रविवारी रात्री उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.








