ऑनलाईन टीम / मिरज
कोरोना संसर्गजन्य आजाराने विशेष करुन वैद्यकीय क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेरची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या रोगाचा नायनाट करण्यासाठी जिह्यात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची गरज होती. ती सिनर्जी हॉस्पिटलच्या माध्यमातून पूर्णत्वास आल्याने ‘सिनर्जी’मुळे वैद्यकीय पंढरीला एक प्रकारची ‘एनर्जी’मिळाली असल्याचे गौरवोदगार राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री नामदार जयंत पाटील यांनी काढले.
सांगली – मिरज रस्त्यावर चंदनवाडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सिनर्जी मल्टीस्पेसालिटी या अत्याधुनिक हॉस्पिटलचे उदघाटन स्वातंत्र्य दिनादिवशी नामदार जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. अत्याधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त अशा सिनर्जी मल्टीस्पेसालिटी हॉस्पिटलमध्ये 18 विभाग असून, सांगली – मिरज परिसरातील 45 हून अधिक वैद्यकीय तज्ञ या रुग्णालयात सेवा देणार आहेत. रुग्णालयातच हेल्थपॉईंट मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल हे 50 बेडचे कोविड-19 सेंटरही सुरू केल्याचे यावेळी सिनर्जी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रविंद्र आरळी, कार्यकारी संचालक प्रसाद जगताप यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








