कुपवाड / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील सावळी ते तानंग मुख्य रस्त्यावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर आणि दुचाकीचा अपघात झाला. शंभुराजे कोल्ड स्टोअरेज समोर आज सायंकाळी झालेल्या या अपघातात मिरज तालुक्यातील शिपूरची महिला जागीच ठार झाली. सविता नरेश क्षीरसागर (वय ५५) असे मृत महिलेचे नाव असून पती नरेश विठोबा क्षीरसागर (वय ६०) दोघे रा. शिपूर हे गंभीर जखमी आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दोघे पती-पत्नी दुचाकीवरून जात होते. ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात रस्त्यावर पसरलेल्या खडीवर दुचाकी घसरल्याने दुचाकीवरील पती-पत्नी रस्त्यावर आदळले. यात ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापड़ून पत्नी ठार झाली तर पती गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली असून पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली आहे. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक मात्र पसार झाला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








