कुपवाड / प्रतिनिधी
खासगी सावकारीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी एका महिलेकडे तब्बल २ लाख रूपयाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी चार महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत लताबाई गणपतराव पाटील (रा. रामकृष्णनगर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. यामध्ये सविता महादेव गावडे, शोभा बाळू कसबे, रेखा हेमंत जाधव व लता बाबासाहेब पाटील (सर्व रा. रामकृष्णनगर, कुपवाड)अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावे आहेत. फिर्यादी लता पाटील व त्याचा मुलगा, मुलगी यांना प्रत्यक्ष भेटून, फोनवरून संपर्क साधून खासगी सावकारीचा गुन्हा दाखल न करणेसाठी चार महिलांनी पैशाची मागणी केल्याचे समोर आले आहे.
फिर्यादी लताबाई यांची मुलगी नेहा शिंदे यांनी संशयित सविता गावडे व शोभा कसबे यांना १ लाख ५० हजार रुपये बिनव्याजी दिले होते. संशयित गावडे व कसबे यांनी नेहा शिंदे यांना १५ हजार रुपये देऊन बाकीचे पैसे बुडवून २८ एप्रिल ते १९ में या कालावधीत लताबाई पाटील यांचा मुलगा व मुलगी यांच्या घरी जाऊन संशयित चार महिलांनी खासगी सावकारीबाबत पोलिसांत तक्रार दाखल न करण्याची तसेच प्रकरण मध्यस्थीने मिटवण्यासाठी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून २ लाख रुपयांची मागणी करून धमकी दिल्याचे समोर आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








