प्रतिनिधी / जत
महापुराचे पाणी दुष्काळी जतला देण्याची मागणी शासनाकडे सातत्याने करत त्याचा पाठपुरावा सुद्धा केला होता. त्यामुळे सध्या कृष्णा नदीला आलेले अतिरिक्त पाणी जतला सुरू झाले आहे. या पाण्यातून तालुक्यातील सिंचन तलाव भरून घेण्यात येणार असून उर्वरीत व अर्धवट कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना आमदार विक्रमसिंह सावंत यांनी योजनेच्या अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.
आमदार म्हणाले की, देवनाळ तलाव क्रमांक 2 मध्ये हे पाणी सोडल्यास सिद्धनाथ, संख,भिवर्गी तलावात पाणी येऊ शकते. त्याचबरोबर म्हैसाळ योजनेच्या पूर्ण झालेल्या कामाच्या माध्यमातून तालुक्यातील ओढे, नाले, छोटे तलाव पाण्याने भरून घेण्यात येणार आहेत. यावेळी सनमडी, लवटेवस्ती आणि देवनाळ भागातील योजनेची कामे पूर्ण करण्याची सूचना दिल्या. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,बाबासाहेब कोडग, म्हैसाळ योजनेचे अधिकारी अभिमन्यू मासाळ, मनोज कर्नाळे, भिमाशंकर तेली आदी उपस्थित होते.
Previous Articleभारताला सर्वाधिक प्राधान्य देऊ!
Next Article सांगली : कृष्णा नदी पाणी पातळीत झपाट्याने वाढ








