प्रतिनिधी / कडेगाव
गेल्या कित्येक दिवसांपासुन यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यामध्ये कायमस्वरुपी वनक्षेत्रपालांची नेमणुक करावी अशी मागणी कडेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मिडिया अध्यक्ष संदेश जाधव यांनी मुख्य वन्यजीव वनक्षेत्रपाल कोल्हापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात संदेश जाधव म्हणाले आहेत की, अनेक दिवसांपासुन सागरेश्वर अभयारण्यामधये वनक्षेत्रपाल या पदावरती कोणीही अधिकारी व्यक्तीची नेमणुक करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी जीव आहेत. सदर ठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी वनक्षेत्रपालांच्या नियुक्तीची गरज आहे. येथे असणारे वन कर्मचाऱ्यांवर काटेकोर नियोजन व नियंत्रण असण्यासाठी या पदाच्या नियुक्तीची गरज आहे.
तसेच येथील वन्य प्राणी तसेच नैसर्गिक संपदेच्या संरक्षणासाठी या उच्च पद्स्थ अधिकारी पदाची नेमुणक करणे गरजेचे आहे. अभयारण्याचे रक्षण व संरक्षण करण्याच्या दृष्टीकोनातुन व तेथील मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून या पदाची लवकरात लवकर नेमणुक करावी. वरील बाबींचा विचार करुन कार्यवाही न केल्यास या परिसरातील वनप्रेमी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संविधानिक पध्दतीने आंदोलनाचा मार्ग स्विकारणार असल्याचे जाधव म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








