प्रतिनिधी / सांगली
सांगली येथे लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करीत दुकाने उघडल्याप्रकरणी सहा दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेच्या पथकांनी ही कारवाई केली.
शहरात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळता अन्य दुकाने उघडण्यास मनाई आहे. मात्र शहरातील काही व्यापाऱ्यांनी बुधवारी दुकाने उघडली. याची माहिती मिळताच अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांनी महापालिका कर्मचारी तसेच पोलीस फोजफाट्यासह बाजार पेठेत पोहचल्या. पाच दुकाने मनाई असताना सुरू असल्याचे आढळून आले. तात्काळ त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.








