प्रतिनिधी / सांगली
बांधकाम कामगारांतर्फे सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर सोमवारी विविध मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली. तसेच सांगलीचे सरकारी कामगार अधिकारी सोनार यांना निवेदन देण्यात आले.
यासंदर्भात बोलताना शिष्टमंडळाच्या वतीने कॉ. पुजारी म्हणाले की, मागील सहा महिन्यांपासून लॉकडाऊनमध्ये बांधकाम कामगार उपासमारीमध्ये जगत आहेत. त्यांना दरमहा पाच हजार रुपये मिळाले पाहिजेत. फक्त सहा महिन्यांमध्ये दोन हजार रुपये दिले आहेत. तेही सर्वांना मिळालेले नाहीत, अशा विविध मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
याबाबत सरकारी कामगार अधिकारी मोहन सोनार यांनी सांगितले की, विधवा महिलांच्या पतींच्या अंत्यविधीची दहा हजार रुपये रक्कम तीन दिवसात देण्यात येईल इतर सर्व लाभांची रक्कम मिळण्याबाबत आणि ऑनलाईन कामकाजाबाबत 17 ऑगस्ट रोजी सकाळी संयुक्त बैठक सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांनी आयोजित केलेली आहे. बैठकीचे निमंत्रण पत्र संघटनेला दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. शंकर पुजारी, शंकर माने, अमित कदम, संदीप पाटोळे, वर्षा गडाचे, तुकाराम जाधव, गोरख चव्हाण, हनुमंत माळी, विष्णू माळी आदींनी केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








