मिरज शहर पोलिसांनी साडेसात लाखांची रोकड मूळ मालकाला केली परत
प्रतिनिधी/मिरज
येथील सराफ व्यावसायिकाला कर्जाचे आमिष दाखवून 39 लाख, 93 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून फसवणूकीतील 7 लाख, 60 हजार, 100 रुपयांची रक्कम मूळ मालकांना परत केली आहे. रमेश विरभद्र किवटे (वय 49, रा. नदीवेस कुरणे गल्ली, ज्योतिर्लिंग मंदिराजवळ, मिरज) यांनी प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
सराफ व्यावसायिक रमेश किवटे यांची सचीन व्यंकटेश देशपांडे, अजय पवार उर्फ अभिषेक भंडारे, श्रीमती प्रियांका शेट्टी, मिथुल कन्नुभाई त्रिवेदी यांनी किवटे यांच्या फोनवर बँकेचे खोटे मेसेज पाठवुन एचएचबीसी या बँकेतुन त्यांच्या प्रॉपर्टीवर दिड कोटी रूपये इतके कर्ज मिळवून देतो असे सांगुन त्यांचेकडुन बँकेत डिपॉझिट करण्यासाठी प्रोसेसिंग फी मॉर्गेज स्टॅम्प डयुटी या कामासाठी एकुण रक्कम रूपये ३९ लाख, ८३ हजार, 900 रुपयांची फसवणूक केली होती. सदर घटनेबाबत किवटे यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली होती.
दाखल गुन्हयामध्ये दोघांना अटक झाली आहे. पोलीसांनी अटक आरोपीकडुन ७ लाख ६०हजार १०० रु. इतकी रोख रक्कम जप्त केली होती. सदरची जप्त रक्कम फिर्यादी यांना परत करण्याबाबत न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्याने पोलिसांनी ही रोख रक्कम किवटे यांना परत केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








