प्रतिनिधी / विटा
जीव धोक्यात घालून गावोगावी सरपंच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणा राबवित आहेत. आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून काम करताना मर्यादित साधने आणि अधिकार असतानाही गावच्या हिताची भूमिका घेऊन सरपंच काम करीत आहेत. त्यांना कोव्हीड योद्धा म्हणून सन्मानित करावे आणि शासन दरबारी तशी नोंद व्हावी, अशी मागणी मादळमुठीचे सरपंच सिद्धेश्वर धावड यांनी केली आहे.
याबाबत मादळमुठीचे सरपंच सिद्धेश्वर धावड म्हणाले, करोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी गेली काही महिने सातत्याने सर्वजण कार्यरत आहेत. गावपातळीवर ग्रामस्थ, अधिकारी, कर्मचारी, अाशाताई,अारोग्य अधिकारी, प्रशासन, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी, समाजसेवक, करोना या जिवघेण्या संकटाशी अापला जीव धोक्यात घालुन मुकाबला करित अाहेत. त्यांच्या कामाला सलाम करावा लागेल.
यापैकी काहींची करोना योद्धा म्हणुन शासन दरबारी दखल घेण्यात अाली अाहे. काम करणाऱ्या लोकांच्या मागे उभा रहावे लागेल. यासाठी शासनाचे आभार मानावे लागतील.
परंतु या संकटाशी मुकाबला करणेसाठी गावपातळीवर गेले काही महीने सरपंच सुद्धा कार्यरत अाहेत. गावोगावच्या आपत्ती व्यवस्थापन समितीची जबाबदारी सरपंचांना दिली आहे. प्रसंगी वाईटपणा घेऊन गावचे रक्षण करण्याचे काम जीव धोक्यात घालून ते करीत आहेत. गावचे प्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी दिली आहे. त्यानांही करोना योद्धा म्हणुन संबोधीत करण्याची गरज आहे. गावोगावी
सरपंचांना करोना योद्धा म्हणुन जाहीर करावे.
तशी शासन दरबारी त्यांची नोंद व्हावी. चांगले काम करणारांना प्रोत्साहन द्यावे. यामुळे ते अधीक ऊत्साहाने करण्यासाठी प्रोत्साहीत होतील, असेही सरपंच धावड यांनी म्हंटले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








