प्रतिनिधी / सांगली
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चातर्फे सांगली समाज कल्याण ऑफिसवर धडक मोर्चा काढण्यात आला.ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष व नगर सेविका स्वाती शिंदे, यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजकल्याण मधील सावळा गोंधळ निदर्शनास आला.
समाजकल्याण मध्ये येणाऱ्या कर्ज योजना जनतेपर्यंत पोहोचवा व योजनांचे प्रबोधन करा व येत्या महिन्याभरात जिल्हाधिकारी व भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा व समाजकल्याण अधिकारी यांची बैठक बोलवा व ओबीसी प्रवर्गाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली शेळके,अल्पसंख्याकमोर्चाचे जिल्हाध्यक्ष शहानवाज सौदागर, जिल्हा सरचिटणीस रोहीत घुबडे-पाटील ,युवक अध्यक्ष राहुल माने ,श्रीकांत वाघमोडे जिल्हा उपाध्यक्ष शिवरूद कुंभार, मनोज यमगर,संदीप लेंगले,संजय कोटकर वरद पडळकर, नाना मगदूम ,श्रीधर मेस्त्री ,चिटणीस अजय काकडे,रोहन संकपाळ, अनिकेत मोहिते,आधीनात शेडबाळे, प्रसाद वळखंडे, स्वरुप रानभरे, शशीकांत माने, प्रवीण जगताप, आदी पदाधिकारी उपस्थित होते.








