प्रतिनिधी / सांगली
मिरज तालुक्यातील समडोळी येथे जिल्ह्यातील व पश्चिम भागातील सामान्य जनतेच्या हितासाठी उभारण्यात आलेल्या पहिले ५० बेडच्या स्वाभिमानी कोरोना केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते सायंकाळी पाच वाजता आदिगिरी येथे होणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना व न्यु रणझुंझार युवक मंडळाच्यावतीने कोरोना केंद्र सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे केंद्र लोकवर्गणी, ग्रामपंचायत, शासकीय आरोग्य विभाग, खासगी डॉक्टर्स आणि गावातील सार्वजनिक मंडळ यांच्या सहकार्यातून सुरू केले असल्याची माहिती स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय बेले यांनी दिली.
संयोजन न्यू रणझुंझार युवक मंडळ व स्वाभिमानी युवा आघाडीचे कार्यकर्ते करीत आहेत. याप्रसंगी वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, जिल्हा परिषद सदस्या सुरेखाताई आडमुठे, युवा नेते संजय बेले, पोपट मोरे, सरपंच विलास अडसूळ, ग्रामसेवक संतोष संकपाळ, विजय राजमाने, डॉ. राहुल रूगे, डॉ. श्रध्दा बेले, विद्याधर बेले, राजेंद्र बेले, भरत पाटील आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
Previous Articleसोलापुरात पुन्हा लॉकडाऊन नाही : जिल्हाधिकारी
Next Article सांगली : आटपाडी तालुक्यात 66 पॉझिटिव्ह








