सांगली / प्रतिनिधी
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मंजुर झालेल्या पत्रांचे वाटप या समितीच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षा ज्योती आदाटे तसेच समिती सदस्य यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व लाभार्थ्यांना प्रबोधन करण्यात आले ते असे त्यांनी बॅकेत पैसे जमा झाल्यानंतर स्वतः पैसे काढुन घेणे दलालांची भिती न बाळगता निर्भयपणे व्यवहार करणे, कोणी दलाल पिळवणूक करीत असेल तर डायरेक्ट समितीशी संपर्क साधावा तसेच बॅकेत पैसे जमा झाल्या झाल्या पैसे काढावे. जर तीन महिने पैसे काढले नाही तर मंजुर झालेली पेन्शन योजनाच बंद होते. यावेळी तहसीलदार के व्ही घाडगे तसेच समिती सदस्य अनिता निकम आशा पाटील बिपिन कदम आणि सहायक प्रियांका तुपलोंडे उपस्थित होते.








