आष्टा / प्रतिनिधी
कासेगाव शिक्षण संस्थेच्या आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज आष्टाचा खेळाडू संकेत महादेव सरगर याने ताश्कंद, उज्बेकिस्तान येथे सुरू असलेल्या जागतिक वेटलिफ्टिंग व कॉमनवेल्थ स्पर्धेत स्नॅच या प्रकारामध्ये 113 kg वजन उचलून राष्ट्रीय विक्रमासह सुवर्ण पदक जिंकले.
जागतिक पातळीवर यश संपादन केलेल्या संकेत सरगरचे कासेगाव शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक व राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंतराव पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले. तसेच संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील,सचिव प्राचार्य आर.डी.सावंत, सहसचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र कुरळपकर यांनी अभिनंदन केले.
त्याला कोच मयूर सिंहासने यांनी उत्तम दर्जाचे कोचिंग दिले व प्रा.अक्रम मुजावर यांचे मार्गदर्शन लाभलेसंकेतच्या या जागतिक पातळीवरील यशाबद्दल महाविद्यालयामध्ये पेढे वाटून व फटाके वाजवून प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी या आनंदोत्सव साजरा केला.