वार्ताहर / कोकरुड
शेडगेवाडी फाटा (ता. शिराळा) येथील अंबिका स्टील सेंटर मधील साडे सतरा लाखाच्या चोरी प्रकरणी फिर्यादीच चोर निघाला. याप्रकरणी फिर्यादी जयंतीलाल रामलाल ओसवाल याला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत याबाबत माहिती दिली.
संशयित जयंतीलाल रामलाल ओसवाल याचे शिराळा-चांदोली रस्त्यावर शेडगेवाडी फाटा या ठिकाणी स्वतःच्या मालकीचे अंबिका स्टील या नावाचे दुकान आहे. त्यांच्या लहान भावास नवीन स्टील दुकान सुरु करण्यासाठी पैसे द्यायचे ठरले होते. मात्र जयंतीलाल यास ते मान्य नसल्याने त्याने मंगळवार दि.६ रोजी सर्व कुटूंबियासह कराडला जेवण करुन आल्यावर आपल्या घरात चोरी झाली असल्याचा गुन्हा कोकरुड पोलिसात दाखल केला होता. याप्रकरणी प्रथम पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली होती. मात्र जयंतीलाल याच्या मोबाईल आणि तपासावरून हाच आरोपी असल्याने शनिवारी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता भावास पैसे द्यायचे नसल्याने मी साडे सतरा लाख रुपये कराड येथील मित्राकडे ठेवल्याचे त्याने सांगितल्याने. वरील सर्व रक्कम ताब्यात घेऊन आरोपीस अटक करण्यात आली.
गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनीषा दुबुले, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या सुचने प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, सहायक पोलिस फौजदार शंकर कदम, पोलीस एकनाथ भाट, मोहसीन मुल्ला, विशाल भोसले, शेखर गायकवाड,कॅप्टन गुंडवाडे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








