जत / प्रतिनिधी
जत तालुक्यातील शेगाव येथे बेकायदेशीर गांजा लागवड केलेल्या शेतात छापा टाकून एकवीस किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या गांजाची किंमत १ लाख २९ हजार आहे. याप्रकरणी तानाजी जगन्नाथ शिंदे (वय. 62) यांच्यावर मानवी मनावर परिणाम करणारे अमली पदार्थ जोपासना केल्याप्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . संशयित तानाजी शिंदे यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या पोलिसांनी अटक केले आहे.
अधिक माहिती अशी शेगाव येथे गुळवंची रस्त्यालगत तानाजी शिंदे यांच्या मळ्यात गांजा लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला माहिती मिळाली होती.यानुसार बुधवारी सहा वाजण्याच्या सुमारास गांजा लागवडीच्या ठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी गांजाची तीन ते पाच फूट उंचीची झाडे आढळून आली. या गांजा च्या झाडाचे वजन केले असता साडे एकवीस किलो वजन भरण्यात आले. सध्या बाजार भावानुसार या गांजाची किंमत १ लाख २९ हजार होते. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पीएसआय ढेरे,हवालदार जाधव आदींनी केली आहे.
Previous Article‘प्रयास इंडिया’ ठरतेय एक वरदान
Next Article रेल्वेत रात्री चार्ज करता येणार नाही मोबाईल









