वार्ताहर / आळसंद
सामाजिक कार्यकर्ते शिवानंद स्वामी यांनी हरिद्वार येथे गेली आठ दिवसांपासून गंगानदी पात्रात विविध मागण्यांसाठी लक्षणिक उपोषण सुरू आहे. जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी केलेल्या आवाहनानुसार बलवडी भा. ( ता.खानापूर ) येथील ग्रामस्थांनी येरळा नदीत उभे राहून पाठिंबा दिला.
शिवानंद स्वामी यांनी सोमवार (ता.३ ) पासून हरिद्वार येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या मागणीकडे केंद्र सरकार दुर्लक्ष केले आहे. गंगा नदी अस्वच्छता मोठ्या प्रमाणात आहे. नदीवर अतिक्रमण वाढले आहे. ते काढण्यात यावे, देशभरातील नद्यांचे अस्तित धोक्यात आले आहे. देशातील नद्यांना पुर्वीसारखे वाहत्या कराव्यात, यासह विविध मागण्यासाठी आंदोलन केले आहे. स्वामींच्या आंदोलनास देशभरातून पाठिंबा मिळत आहे. जगभरात १०८ ठिकाणी आंदोलन सुरू आहे. दरम्यान, सांगली येथील कृष्णा नदीकाठावर जलबिरादारीचे डॉ. रविंद्र व्होरा, डॉ. मनोज पाटील यांनी शिवानंद स्वामी यांच्या उपोषणास पाठिंबा दिला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार, देवकुमार दुपटे , धनाजी जाधव, प्रशांत पवार, दीपक पवार , अमीर सय्यद, ओंकार जाधव, जोतिराम तुपे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








