प्रतिनिधी / आटपाडी
कोरोनाच्या कालावधीत आटपाडी तालुक्यातील उपाययोजना आणि बाधितांच्या रूग्णसेवेसाठी झटणारे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा शिवसेना नेते तानाजी पाटील यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यासह शिवसेनेचे तालुकाप्रमुख, युवा सेना तालुकाप्रमुखांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला असुन शिवसेना नेत्यांचा अहवाल पॉझिटिव्हसह आटपाडी शहराची वाढती रूग्णसंख्या चिंतेचा विषय बनली आहे.
आमदार अनिल बाबर, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांचा अहवाल कालच कोरोना पॉझिटिव्ह आला. आमदार बाबर यांच्यासह अन्य काही पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात तानाजी पाटील आले होते. तसेच कोरोनाच्या उपाययोजनांसाठी त्यांचा आटपाडी तालुक्यात सातत्याने दौरा सुरूच होता. या सर्वांमध्ये त्यांना शनिवारी रात्री त्रास जाणवु लागल्यानंतर रविवारी टेस्ट करण्यात आली असता ते पॉझिटिव्ह आले. त्यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख, युवा सेना तालुकाप्रमुख व अन्य सहकारी असे पाचजण पॉझिटिव्ह आले. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन शिवसेना नेते तानाजी पाटील यांनी केले.
रविवारी आटपाडी शहर १२, बोंबेवाडी ४, कौठुळी १, पुजारवाडी आ.३ आणि कोळे येथील दोघे असे एकुण २२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आत्तापर्यंत तालुक्यातील बाधितांची आकडेवारी सव्वासहाशेच्यावर पोहचली असुन वाढत्या रूग्णसंख्येमुळे आटपाडी शहरातील चिंतेतभर पडली आहे. तालुक्यातील दिघंची गावाने वाढती रूग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊन केले असुन तालुक्याचे ठिकाण असलेल्या व मोठ्या संख्येने कोरोनाबाधित असलेल्या आटपाडीत लॉकडाऊन करावा, अशी मागणी जोर धरत आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचीच भिती आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








