प्रतिनिधी / सांगली
गिता हौसिंग सोसायटी, अभयनगर येथील परिसरातील शिवतीर्थ क्रिडा व सांस्कृतिक मंडळाने यंदा किल्ले कोंढाणा (सिंहगड)ची प्रतिकृती उभारली आहे. तसेच किल्ल्यावर हालता देखावा ही तयार केला असून ते पाहण्यास मोठी गर्दी होत आहे.
या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच अशाप्रकारच्या किल्ल्यासह हालत्या देखाव्याची सुरुवात या मंडळाने केली आहे. या किल्ल्याच्या माध्यमातून नरवीर तानाजी मालूसरे यांचा व शिवकाळचा इतिहास कसा घडला असेल हा हलता देखाव्या स्वरूपात दाखवण्याचा छोटासा प्रयत्न या मंडळाने केला आहे व मावळ्यांची स्वराज्य निष्ठा व पराक्रम नविन पिढीमध्ये रूजवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी अध्यक्ष अमर निंबाळकर, उपाध्यक्ष संदिप माने, खजिनदार कपिल कदम, सचिव अभिजीत कदम, अरुण निंबाळकर, सुयश सरोळकर, मनोज गडदे, मोहन डोंगरे, धनंजय घाटगे, रोहीत मदने, सुशील साळुंखे, राहुल खंडागळे आदींसह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.








