शिराळा /वार्ताहर
शिराळा तालुक्यातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रात संस्थात्मक विलगीकरण करणासाठी ७५ ते १०० बेडची व्यवस्था करावी. तसेच तालुक्यात ९५ गांवात कम्युनिटी क्वारंटाईनसाठी शाळा व मंगल कार्यालयात सोय करावी आदी सूचना जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी शिराळा येथील दौर्यावेळी दिल्या. तसेच त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात आलेल्या १५५ बेडच्या कोविड सेंटरला हि भेट दिली.
यावेळी चौधरी म्हणाले, तालुक्यातील सात आरोग्य केंद्रात कुटुंबांचे आरोग्य सर्वेक्षण करा, कोरोना लक्षणे आढळली तर तातडीने तपासणी करा, जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा सुरळीत असुदे, जनजागृती करा, कंटेन्मेंट एरियात पोलीस संरक्षण ठेऊन नागरिकांची वर्दळ होऊ नये याची दक्षता घ्या, कचरा व्यवस्थापन व स्वच्छता चांगली ठेवा, मास्कचे वाटप करा आदी सूचना हि केल्या.
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे. गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रविण पाटील, प्रांताधिकारी नागेश पाटील,पोलीस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील उपस्थित होते.
Previous Articleग्रीन झोनमध्ये 3 मे नंतर मद्यविक्रीची शक्यता
Next Article राज्यात एकाच दिवशी 14 संसर्गमुक्त








