प्रतिनिधी/शिराळा
खेड (ता. शिराळा) येथील आप्पासो राजाराम खबाले (वय-60) यांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. 1 जानेवारी रोजी ते कपडे धुणे आणि अंघोळीसाठी गेले असताना त्यांना आकडी आल्याने ते विहीरीत पडले. तिसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह विहिरीत आढळला. याबाबत दादासो खबाले यांनी शिराळा पोलीसात वर्दी दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की ,आप्पासो खबाले यांना आकडीचा त्रास होता. शिवाय त्यांना दारूचे व्यसन होते. ते खेड येथे मोलमजुरी करून गावातीलच भैरवनाथाच्या मंदिरात झोपत असत. त्यांची पत्नी मुलांसह माहेरी चिखलवाडी येथे राहण्यास आहे.ते एक जानेवारीपासून गावात आढळून आले नव्हते. भावकीतील लोकांनी त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी त्यांची कपडे मोळीतील विहिरीजवळ आढळल्याने त्यांचा विहिरीत शोध सुरू झाला. विहिरीत पाणी असल्याने आणि त्यांचा मृतदेह गाळात अडकल्याने सापडला नाही. तिस-यादिवशी विहिरीतील पाणी उपसा करून त्यांचा मृत्युदेह गाळाततून बाहेर काढण्यात आला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








