वार्ताहर / कोकरूड
शिराळा तालुक्यातील मेनी खोऱ्यातील शिरसटवाडी येथील वृद्ध शेतकरी राजाराम पांडुरंग शिरसट (वय ८३) या शेतकऱ्यांचा बांध पेटविताना लागलेल्या आगीत होरपळून मत्यु झाला. ही घटना आज दुपारी १ च्या सुमारास घडली असून घटनेची नोंद कोकरुड पोलीसात झाली आहे.
पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राजाराम शिरसट यांची वाघाचा डोंगर परिसरात खळघाट परिसरात एक एकर शेती असू असून या ठिकाणी हे आपल्या पिकाची राखण करायला सकाळी गेले होते.
सोमवारी दुपारी १ च्या सुमारास शेताच्या शेजारी असणारे बांध आणि पाला पाचोळा जाळत असताना आग पिकाकडे येऊ नये म्हणून विजवताना त्यांचा पाय घसरल्याने तोल जाऊन ते आगीत पडले. या आगीत त्यांना ९० टक्के पेक्षा जास्त भाजल्याने होरपळून मृत्यू झाला. त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले असताना मृत्यू झाला. या बाबतचा गुन्हा कोकरुड पोलिसात दाखल करण्यात आला आहे.








