प्रतिनिधी / आटपाडी
दरोडे चोऱ्या हाणामारी यासह गुन्हेगारी विश्वाशी कायमस्वरूपी नाव जोडले गेलेल्या पारधी समाजातील दोन मुलांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले. स्वतःचा आणि पिढ्यान पिढ्यांचा ठपका घेऊन जीवन जगणाऱ्या समस्त पारधी समाजाचा पांग फेडण्याचे काम या दोन विद्यार्थ्यांनी केले. त्यांचा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा आटपाडी एज्युकेशनचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
आटपाडी शहरासह तालुक्यात अनेक पारधी कुटुंबे आहेत अपवाद वगळता जुने गाणे गुन्हेगारी विश्वासच नाते जोडले आहे पण पण काही पारधी समाजातील कुटुंबीयांनी आपले आणि समाजाची वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम केले आहे. आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या करगणी येथील श्रीराम राम हायस्कूल मध्ये शिक्षण घेणारे महेश पवार व दत्तात्रय पवार या दोन विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी मध्ये चांगल्या गुणांसह यश मिळवेल इतर विद्यार्थ्यांच्या यशासोबत या दोन पारधी समाजातील मुलांच्या यशाची वेगळेपण इतरांसाठी प्रेरणादायी ठरले.
सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिक्षणप्रेमी अमरसिंह देशमुख यांनी या दोन मुलांच्या यशाचा अभिमान व्यक्त केला आणि त्यांच्या पालकांसह विद्यार्थ्यांचा गौरव केला.
पारधी समाज पारधी तांडा आणि त्यांच्यावर पडलेल्या शिक्का शिक्षणाच्या माध्यमातूनच पुसला जाईल हे या दोन मुलांनी सिद्ध केले असून त्यांची एक बहीण सध्या पदवीच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असून मुख्याध्यापक अरुण गायकवाड व शिक्षकांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








