सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. व्ही. साळी
प्रतिनिधी / सांगली
नागरिकांच्या सोयीसाठी परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पध्दतीने (घरबसल्या) जारी करण्यासाठीची सुविधा 14 जून 2021 पासून सुरू करण्यात आली आहे. शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी अर्ज करीत असताना अर्ज छाननी कारणांसाठी प्रलंबित दिसतात.
अशा अर्जदारांनी आधार कार्डच्या डाटामध्ये (पत्त्यामध्ये) बदल केला असल्यामुळे व फॉर्म 1ए अपलोड केला असेल तर अशा अर्जदारांनी अर्जाची छाननी संबंधित सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्याकडून कार्यालयात येवून करून घेतल्यानंतर ऑनलाईन (घरबसल्या) परीक्षा देता येईल, असे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पी. व्ही. साळी यांनी कळविले आहे.








